I am Heena Naved
As a parent, I am incredibly grateful for the support and guidance we received from the Project Hope at Tomoae School. The remedy classes and therapy sessions have made a profound difference in my son’s life. Over the past few years, we have witnessed remarkable growth in his confidence and abilities. I would like to extend a special thank you to Mrs. Vaishali Avale for her exceptional support and to the late Mrs. Jaimala Jadhav for her dedication and compassion. The tailored approach and nurturing environment created by the staff have provided my son with effective coping strategies. Your unwavering commitment to helping families like ours has truly given us hope for a brighter future

Mission of the School
“Our mission is to cultivate curious, creative, and confident learners by making education a delightful and enriching experience. With a team of passionate and skilled educators, we provide a nurturing environment that encourages exploration, discovery, and growth. By leveraging hands-on learning, real-world examples, and innovative teaching methods, we empower our students to develop a strong foundation in critical thinking, problem-solving, and creativity, ultimately unlocking their full potential and preparing them for success in an ever-evolving world.”
Vision of the School
“Our vision at Tomoae Primary School is to empower students to acquire, demonstrate, articulate and value knowledge and skills that will support them as lifelong learners, to participate in and contribute to the global world and practice the core values of the school: Respect, tolerance & inclusion, and excellence.”
I am Heena Naved
As a parent, I am incredibly grateful for the support and guidance we received from the Project Hope at Tomoae School. The remedy classes and therapy sessions have made a profound difference in my son’s life. Over the past few years, we have witnessed remarkable growth in his confidence and abilities. I would like to extend a special thank you to Mrs. Vaishali Avale for her exceptional support and to the late Mrs. Jaimala Jadhav for her dedication and compassion. The tailored approach and nurturing environment created by the staff have provided my son with effective coping strategies. Your unwavering commitment to helping families like ours has truly given us hope for a brighter future
I am Afraaz Hussain ,
I want to thank everyone at Project Hope for helping me learn and grow. The classes and sessions have been really fun, and I’ve learned so much about myself. I feel more confident and happy because of the support I’ve received. A special thank you to the late Mrs. Jaimala Jadhav mam for her kindness and guidance and Mrs. Vaishali Avale mam for being such a great principal and leadership I also appreciate everything my teachers do to help me succeed. I am excited to keep learning and growing with all of you.
Sincerely yours
Afraaz Hussain.
शिक्षणामध्ये कोणती कौशल्य आणि गुणवत्ता विकसित केली जाते? पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार करून कोणत्या शैक्षणिक साहित्याचा आणि पद्धतीचा अवलंब केल्या जातो? अशा विस्तृत स्वरूपातील अभ्यासासाठी जाधव मॅडमला पाठविण्यात आल्याचे कळते. जाधव मॅडम या अभ्यास दौऱ्यावरून परत आल्यावर त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर, काय कार्यवाही झाली हे माहित नाही. मात्र मॅडम सेवानिवृत्त झाल्यावर, या अभ्यासक्रमाचा आणि अनुभवाचा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ व्हावा या उदात्त हेतूने. मॅडमनी सुरुवातीला आपल्या परिचयातील आप्तेष्टांच्या 25 मुलांना या पद्धतीने शिकविण्यासाठी प्री प्रायमरी हवे तर बालक मंदिर म्हणा आपल्या राहते घरी परांजपे कॉलनी येथे सुरू केले. या 25 मुलांमधील अभूतपूर्व बदलाने पुढील वर्षी याच मुलांच्या परिचयातील लोकांनी आपल्या पाल्यांना या प्रि प्रायमरीत प्रवेशासाठी तोबा गर्दी केली. त्यामुळे या प्री प्रायमरीच्या शाखा वाढविण्याची गरज पडली आणि केशव कॉलनी, गणेडिवाल लेआउट, तसेच परांजपे कॉलनीतील आपल्या राहत्या घराच्या शेजारी अशा अनेक ठिकाणी प्री प्रायमरी चा डोलारा उभा झाला. हा प्रयोग इतका यशस्वी झाला की, आजही तोमोईच्या प्री प्रायमरी वर्गात प्रवेशासाठी आपल्या अपत्याचा जन्म झाल्या झाल्या नंबर लावावा लागतो. कुठलेही आमिष प्रवेशासाठी चालत नाही. नोंदणी नुसार क्रमवारीत आपण बसत असाल तरच प्रवेशाची हमी मिळते.
या यशाचे कारणही तसेच आहे. या बाल वयातील मुलांना शिक्षण देण्यासाठी लागणाऱ्या शिक्षकांमध्ये ज्या वैशिष्ट्यांची आणि गुणवत्तेची गरज भासणार होती. त्यासाठी जाधव मॅडम यांनी स्वतःच त्यांना प्रशिक्षणाची सोय केली. स्वतःच्या निगराणीत आणि अध्यापनाखाली तयार करण्यात आलेल्या या शिक्षकांमार्फत मुलांना दर्जेदार शिक्षण दिले जाऊ लागले.
मात्र पुढेही मुलं आता कुठल्या शाळेत जातील? हा प्रश्न गंभीर होता. जर ही पुन्हा जुन्याच वातावरणात गेली तर त्यांचा दर्जा तसाच राहील का ? हा प्रश्न आ पासून उभा ठाकला. अनेक पालकांनी मॅडमला विनंती केली, त्यातूनच तोमोई’ प्रायमरी इंग्रजी स्कूल सुरू करण्याचा विचार पुढे आला. पण पुन्हा प्रश्न होता तो हा की शाळा कुठल्या बोर्ड मार्फत चालविण्यात यावी? कोणत्या अभ्यासक्रमाचा स्वीकार करावा? त्यातूनच मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावं म्हणून आयसीएसई पॅटर्नचा पर्याय निवडला गेला आणि अमरावती ला पहिल आयसीएसई पॅटर्न ची शाळा मिळाली. शहरालगत कठोरा या ठिकाणी एका दिमागदार प्रशस्त आणि सर्वच उपकरणांनी सुसज्ज अशा इमारतीची उभारणी करून तोमोई इंग्लिश स्कूलची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर केवळ वर्गखोल्या बांधून भागणार नाही, तर मुलांना विविध खेळात प्राविण्य प्राप्त करता यावं म्हणून भव्य दिव्य पटांगण, क्रीडा मैदान, सुसज्ज प्रयोगशाळा आणि त्यांना जाण्या येण्यासाठी सुंदर अशा बसेसची व्यवस्था या सगळ्या बारीक सारीक बाबींचा विचार तोमोईच्या उभारणीत करण्यात आला आहे. तोमईच्या प्रशासनाची जबाबदारी प्राचार्य वैशाली आवळे मॅडम यांच्याकडे आहे. त्या शाळेची शिस्त आणि प्रशासकीय व्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतातच, पण शाळेतील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कसा उद्विंगत होईल यावरही सातत्याने भर देतात. त्यांच्या साथीला असलेल्या उप प्राचार्या मेघना मॅडम तर सर्व विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने वागून विद्यालयातील सर्व कार्यक्रमाच्या आयोजनात आणि नियोजनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि दिशा दिग्दर्शन करीत असतात. पालक-शिक्षक मिळावे असो की सांस्कृतिक, शासकीय कार्यक्रम असोत सर्वांचे परस्पर वैचारिक आदान प्रदान याबाबत तोमाई मधील शिक्षक रुंद आणि कर्मचारी यांचा मौलिक सहभाग ही तोमोईच्या यशाची महत्त्वाची बाजू आहे. तोमोई मध्ये वर्ग 3 पासूनच विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध व्हावा आणि त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत व्हावा यासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक विषयाचे सेमिनार घेतले जातात. या सेमिनार मध्ये पालकांना आवर्जून उपस्थित राहण्यास सांगण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषण कौशल्य तर विकसित होतेच सोबतच आपला पाल्य कुठे कमी आहे. त्याला कशाची आणि कशा प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज आहे. हे शिक्षकांसोबतच पालकांनाही कळते आणि मूल्यमापनातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख पालक आणि शिक्षकांना समजून येतो. ही या संस्थेची वैशिष्ट्ये वाखाण्याजोगीच आहेत. तसेच शालेय कार्यक्रमात शासन प्रशासनातील मान्यवर तसेच समाजातील प्रतिष्ठितांना सहभागी करून घेत असल्याने. विद्यार्थ्यांमध्ये भविष्याचे वेध निश्चित करण्याची चुरस निर्माण होते आणि शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच क्रीडाविषयक आसक्ती निर्माण होते. आज सूर्यप्रभा शैक्षणिक संस्थेचा हा वटवृक्ष परिपूर्ण बहरला आहे प्री प्रायमरी ते दहावीपर्यंतचे सर्वच वर्ग अतिशय गौरवशाली परंपरेने वाटचाल करीत आहेत. तोमोई हा आता अमरावती आणि परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातील क्रमांक एकचा ब्रँड झाला आहे. गेल्या दहा-बारा वर्षात या विद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी अनेक कठीण परीक्षांमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. विविध क्रीडा स्पर्धांमध्येही तोमोईचा डंका अव्वल आहे. तोमोई चा एक माजी विद्यार्थी म्हणून मला जे काही मिळाले ते खरोखरच खूप मौलिक आहे. ते माझ्या भविष्यासाठीही अतिशय मार्गदर्शक आणि दिशा देई ठरणार आहे. हे विचार केवळ माझे नाहीत तर तोमोई मधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्वच माजी विद्यार्थ्यांचे आहेत. तोमोई ची भरभराट अशीच द्विगिणीत होत राहो हीच सदिच्छा…
तस्मै श्री गुरुवे नमः









